Posts

Showing posts from August, 2019
Image
मंगेशकर घराणं हे मंगेशाचाच अवतार आहे. तरीही आशा भोसले हा चमत्कार आहे. तिच्या आवाजात वीज आहे. ती कोसळते, पण ज्या झाडावर पडते ते जळून जाण्याऐवजी उजळून जातं. वादळ आहे पण काहीही उध्वस्त करीत नाही. मादकता तर विलक्षण आहे पण कामुकता नाही. ती गाताना गाण्याप्रमाणे अल्लड बालिका होऊ शकते, यौवनात प्रवेश करू शकते, स्वत:च्या आयुष्याकडे तटस्थपणे बघणारी योगिनीही होते. लताला सरस्वती माना खुशाल, आशा सरस्वतीच्या हातातली वीणा आहे. वीणेच्या असंख्य तारांपैकी कोणती न कोणती तार प्रत्येकाला छेदून जाते. सरस्वतीला आपण नमस्कार करतो. आदराने पण लांबून. वीणा आपल्या हाताच्या अंतरावर आहेसं वाटतं. लताचा सूर तुम्हांला अज्ञात प्रवासाला घेवून जातो. आशा आपल्या घरी येवून गाते असं वाटतं. घरकुलाला ती ऊब देते. *#वपु काळे #vapu kale #वपुमय_होताना*